भारताच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या “सैनिकांची हाडोळी” अशी खरी ओळख असलेल्या या गावास (ता.चाकुर) पूर्वीपासून “बिनपाण्याची हाडोळी” असे म्हटले जायचे. अत्यंत दुष्काळी परिस्थितीत पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करून पाणी आणावे लागायचे. अनेक वर्षापासून कायम दुर्लक्षित असलेल्या या गावात आता भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासन यांच्या सुजलाम सुफलाम अभियानांतर्गत होत असलेल्या नाला खोलीकरण – रुंदीकरणाच्या कामामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होणार आहे. सदर नाला खोलीकरणाचे काम गावांमध्ये सुरू झाल्यापासून महिन्याभरात तब्बल २३५३ ट्रॉली इतका गाळ शेतकऱ्यांना मोफत मिळालाय.

‘भारतीय जैन संघटना’ यांच्या मार्फत होत असलेल्या कामाने अल्पभूधारक शेतकरी श्री. रामराव अतिशय सुखावले आहेत व या कामाबाबत समाधान व्यक्त करत आहेत. त्यांना नाल्यातील काळ्या मातीचा उपयोग शेतीसाठीही होणार असून, त्यांच्या शेती उत्पादनात नक्की वाढ होईल अशी त्यांना आशा आहे. चला मग पाहूयात आणि ऐकुयात त्यांच्याच शब्दात…..

#SujalamSuphalam #BJS #savewater #waterconservation #hadoli